logo

केंद्रीय निवडणूक आयोगाने नेमलेले.निरीक्षक सेंथील कुमार यांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा!

मन्सूर शहा आयमा न्यूज. (धोत्रा भंनगोजी चिखली.बुलडाणा.):----लोकसभा निवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदान व निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नेमलेले निवडणूक निरीक्षक सेंथील कुमार यांनी पोलीस नियंत्रण कक्षाची पाहणी केली. तसेच कामकाज आणि तयारीचा आढावा घेतला.
निवडणूक निरीक्षक सेंथील कुमार हे २ एप्रिलपासून जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. जिल्हा पोलीस दल व केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका पार पाडत आहेत. लोकसभा निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, याकरिता जिल्ह्यात असलेल्या स्ट्रॉग रूम, स्टॅटीक सर्वेलन्स टीम, स्थानिक पोलीस स्टेशन व संवेदनशील ठिकाणी भेटी देउन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
पोलीस नियंत्रण कक्षाची त्यांनी
पोलीस नियंत्रण कक्षाची पाहणी
सर्वत्र योग्य संपर्क यंत्रणा कार्यरत असल्याबाबतची पाहणी केली. पोलीस बिनतारी संदेश यंत्रणा, डायल ११२ यंत्रणा, तसेच नियंत्रण कक्षातील माहितीच्या अदानप्रदान करणाऱ्या व्यवस्थेची पाहणी केली. आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधाने पोलीस दलातर्फे केलेल्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले. नियंत्रण कक्षातच स्टॅटीक सर्वेलन्स टीमवर (स्थिर निगराणी पथके) निगराणी ठेवण्यासाठी व लोकसभा निवडणूक सूचना देण्याकरिता नियंत्रण कक्षातच स्क्रिन उभाराव्यात, अशी सूचना केली.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी
सुरक्षेसंबंधित सर्व नोंदी घेण्याचे निर्देश
डायल ११२ वर येणाऱ्या निवडणूक आचारसंहिता भंगाबाबतच्या तक्रारी व निवडणुकीशी संबंधित तक्रारींना प्राधान्य देऊन योग्य कायदेशीर कारवाई करावी. बिनतारी संदेश यंत्रणेचा वापर अधिक प्रभावी पद्धतीने वापर करावा, याशिवाय प्रशिक्षित मनुष्यबळ हजर ठेवावे. सुरक्षे संबंधाने सर्व नोंदी नियंत्रण कक्ष येथे घ्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
सुधीर पाटील, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) गजानन कांबळे, दिनकर गावित, वंदना विरणक हे पोलीस अधिकारी उपस्थित होते.



10
1108 views